छत्रपती शिवरायांबद्दल अपमानकारक भाषा वापरणाऱ्या अश्फाक पटेलवर कारवाईची मागणी... - दैनिक शिवस्वराज्य

छत्रपती शिवरायांबद्दल अपमानकारक भाषा वापरणाऱ्या अश्फाक पटेलवर कारवाईची मागणी...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे बहाल एकेरी भाषा वापरुन अर्वाच्च शब्दात टिका करणाऱ्या राष्ट्रद्रोही अश्फाक पटेल याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कॉंग्रेस पक्षाचा मानवाधिकार सेल चा जिल्हाध्यक्ष अश्फाक पटेल रा. जामनेर याने दि. ५ मार्च २०२५ रोजी त्याच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंट ला हिंदुस्थानचा शत्रु क्रूरकर्मा औरंगजेब याचे उदात्तीकरण करण्याच्या हेतुने पोस्ट व्हायरल केली. त्या अनुशंगाने नेटकऱ्यांनी त्याचेवर टिका केली त्या टिकेला उत्तर देतांना अश्फाक पटेल याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करुन त्यांच्या बद्यल अपमानकारक अर्वाच्च भाषा वापरली तसेच औरंगजेब अमर रहे अशा स्वरुपाची कमेंट केलेली आहे.तसेच अश्फाक पटेल याने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्यावर अशा पध्दतीने टिका केल्यामुळे व औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यामुळे सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अश्फाक पटेल याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने मागणी करीत आरोपीवर कार्यवाही करावी. कार्यवाई करण्यास टाळाटळ केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य, मुंबई,मा. ना. गिरीशभाऊ महाजन - जलसंपदा मंत्री म. राज्य,मा. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री- जळगाव,
मा. पोलीस महासंचालक, म.राज्य,मा. जिल्हाधिकारी, जळगाव,मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांना पाठवण्यात आले आहेत यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत बोंडे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करा सदर महापुरुषांच्या ओमान व कारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची उच्चस्तरीय चौकशी करावी त्याचा दहशतवाद किंवा सिमी संघटनेशी संबंध आहे का याबाबतही चौकशी करण्याची मागणी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, विभागीय उपजिल्हा उपाधीक्षक वेरुळे यांच्याकडे मागणी केली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर प्रशांत बोंडे दीपक तायडे कैलास पालवे रवींद्र झाल्टे, अतिश झाल्टे बाबुराव घोंगडे , जिल्हा परिषद चे माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads