शेंदुर्णीतील चोरीप्रकरणी स्नेहदीपभाऊ गरुड यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन – बाजारपेठेत CCTV बसवण्याची मागणी - दैनिक शिवस्वराज्य

शेंदुर्णीतील चोरीप्रकरणी स्नेहदीपभाऊ गरुड यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन – बाजारपेठेत CCTV बसवण्याची मागणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
शेंदुर्णी (06 मार्च 2025): शेंदुर्णी येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी श्री. संदीप  ललवानी आणि प्रसिद्ध कृषी केंद्राचे मालक श्री. वेदांत पाटील यांच्या दुकानांमध्ये काल रात्री चोरीची घटना घडली. या घटनेत दोघांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेनंतर स्नेहदीपभाऊ गरुड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांचे सांत्वन केले. मात्र, केवळ सहानुभूती दाखवून भागणार नाही, तर अशा घटनांना आळा बसावा यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.त्याअनुषंगाने, आज (06 मार्च 2025) रोजी शेंदुर्णी नगरपंचायतीचे कार्यक्षम मुख्याधिकारी श्री. विवेक धांडे यांची भेट घेऊन त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेंदुर्णी बाजारपेठ, बस स्थानक, रिक्षा स्टँड, शाळा, दवाखाने, मंदिरे आणि मस्जिद परिसरात CCTV बसवण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्याधिकारी श्री. धांडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच शासनस्तरावर प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.याप्रसंगी स्नेहदीपभाऊ गरुड, व्यापारी संदीप लालवानी, वेदांत पाटील, तसेच श्रीराम शिंपी आणि निनाद सूर्यवंशी उपस्थित होते.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads