पाच वर्षीय उम्मेअम्माराने पहिला रोजा पूर्ण करून श्रद्धेचा दिला आदर्श घालून .....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली असून, मुस्लिम बांधव श्रद्धेने रोजे (उपवास) पाळत आहेत. या पवित्र महिन्यात मोठ्यांसोबतच लहान मुलेही भक्तीभावाने रोजा ठेवतात. याच धार्मिक परंपरेचे पालन करत जामनेर येथील पाच वर्षीय उम्मेअम्माराने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
उन्हाच्या तीव्रतेने तापमान दिवसेंदिवस वाढत असताना, एवढ्या लहान वयातही उम्मेअम्माराने सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करत अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. तिच्या या धार्मिक समर्पणाचे कौतुक करत आजी, आजोबा, आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
फराज अहमद यांची कन्या असलेल्या उम्मेअम्माराने एवढ्या कमी वयात दाखवलेला संयम आणि श्रद्धा हा समाजासाठी प्रेरणादायी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात तिच्या या समर्पणाचे शहरभर कौतुक होत आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा