संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिव-फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न"समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा जागर करणारा शिव-फुले-आंबेडकरी संगम"
संघमित्रा बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. "शिवराय-भीमराय गीतांचा जलसा" या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. गिरीशभाऊ महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. जितुभाऊ पाटील, संविधान आर्मीचे चीफ मा. जगनभाई सोनवणे, पाळधीचे सरपंच मा. प्रशांत बाविस्कर आणि मा. डॉ. प्रशांत भोंडे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका पंचशिला भालेराव यांनी आपल्या सुमधुर व प्रबोधनात्मक गायनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक कार्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेसाठीचे योगदान अत्यंत प्रभावीपणे उभे केले. त्यांच्या गाण्यांनी संपूर्ण वातावरण भीमभक्तीने भारले आणि उपस्थित भाविकांच्या मनावर अमीट ठसा उमटवला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. दादाराव वाघ यांनी भूषवले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, जामनेर तालुक्यातील विविध जयंती उत्सव मंडळांनी महामानवांचा वारसा जतन करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेने त्यांना गौरव प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अध्यक्ष दादाराव वाघ, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंवर, सचिव किशोर सोनवणे, खजिनदार भारत लोखंडे, सहसचिव संदिप डोंगरे तसेच कार्यकर्ते राज जाधव, गजानन तायडे, राज वाघ, सुशील लोखंडे, प्रशिक सोनवणे, धनराज इंगळे आणि यशवंत सावळे यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि भव्य स्वरूपात पार पडला.
कार्यक्रमाला पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भीमसैनिक, शिवप्रेमी व भगिनीवर्गाने उपस्थिती लावली. कार्यक्रमात सर्वत्र एक वेगळाच ऊर्जावान आणि प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले.
समानतेच्या मूल्यांचा जागर
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनातून संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेने सामाजिक जाणीवेचा दीप प्रज्वलित केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, महात्मा फुले यांचे समतावादी शिक्षण चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचे मोल कार्यक्रमातून प्रभावीपणे समोर आले.
या कार्यक्रमामुळे जामनेर परिसरात सामाजिक उन्नतीची नवी चेतना निर्माण झाली असून, सामाजिक समतेच्या मूल्यांचा वसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
शिवरायांची स्वाभिमानाची मशाल, फुल्यांची शिक्षणाची मशाल आणि बाबासाहेबांची संविधानाची मशाल घेऊनच समाज परिवर्तनाचा प्रकाश पिढ्यानपिढ्या जागवायचा आहे, हेच या कार्यक्रमाचे खरे संदेश आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा