जळगाव जिल्ह्यात 30 एप्रिल–1 मे दरम्यान उष्णतेसाठी यलो अलर्ट जारी
जळगाव : भारत हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यात 30 एप्रिल व 1 मे रोजी उष्णतेसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. याचा अर्थ नागरिकांनी सतर्क राहावे लागणार आहे. साधारणतः तापमान सहन करण्याजोगे असले तरी लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला व आजारी व्यक्तींना मध्यम आरोग्य धोका होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यलो अलर्टचा संदेश म्हणजे – "Be Aware" – सावध रहा आणि योग्य खबरदारी घ्या!
तज्ज्ञांचा सल्ला – उष्णतेपासून बचावासाठी करा हे उपाय:
भरपूर पाणी प्या: दिवसात १०–१२ ग्लास पाणी, लिंबूपाणी किंवा सरबत प्या.
दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. गरज असल्यास छत्री, टोपी वापरा.
हलके व उजळवर्णी सूती कपडे परिधान करा.
सनग्लासेस व टोपी घाला थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी.
चहा, कॉफी व मद्यपानाचे सेवन कमी करा.
वृद्ध, लहान मुले व आजारी व्यक्तींना घरातच ठेवा.
शारीरिक काम सकाळी वा संध्याकाळी करा.
ऊष्माघाताची लक्षणे (डोकेदुखी, चक्कर, उलटी) आढळल्यास त्वरित विश्रांती व उपचार घ्या.
आपत्कालीन किट तयार ठेवा: ORS, थंड पेय व प्राथमिक उपचार साहित्य जवळ ठेवा.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा!
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा