श्रीराम नवमीनिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

श्रीराम नवमीनिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव – शासकीय होमिओपॅथी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमीनिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी आचार्य श्रीराम शर्मा धर्मार्थ दवाखाना, विसजनी नगर, जळगाव येथे हे शिबिर पार पडले.
या शिबिरात महिलांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन तपासणी तसेच आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला. रविपुष्य योगाच्या औचित्य साधून ११६ लहान बालकांना मोफत सुवर्णप्राशन देण्यात आले. तसेच श्री. किसन पावरा आणि श्री. मिथुन बरेला यांनी एकूण ११९ रुग्णांची रक्त तपासणी केली. शिबिरात एकूण ३९१ रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले.
शिबिरात डॉ. मिताली पाटील, डॉ. दिपाली लोढा, डॉ. राहुल चौधरी, डॉ. बबिता मंडळ, डॉ. प्रांजल राजपूत, डॉ. गजानन ढोले, डॉ. पवन पावरा, डॉ. योगेश देशमुख या तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी मा. आयुष संचालक व अधिष्ठाता डॉ. श्री. रमण घुगराळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री. भाईजी मुंदडा, शांतिकुंज महिला मंडळ गायत्री परिवार, आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य श्री. अभिजीत अहिरे, होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, डॉ. पराग भागवत, डॉ. रितेश पाटील, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. केपूर चौधरी, डॉ. योगेश सराटले, डॉ. मनोज विस्पुते, श्री. अनिल झंवर, डॉ. सुरेश अग्रवाल, श्री. नंदकिशोर पाटील, श्री. सुदाम वाणी, श्री. राजेश जैन, श्री. विलास बर्डे, श्री. दिनेश मालू, श्री. भूषण मुंदडा, श्री. अर्जुन वाणी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads