मान्सूनपूर्व तयारीसाठी जामनेर प्रशासन सज्ज – 'आपदा मित्र' पथकासाठी निवेदन, मास्टर ट्रेनर्सचा गौरव
जामनेर – आगामी मान्सून काळात आपत्तीजनक परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत असून, तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षात ‘आपदा मित्र’ शोध व बचाव पथक नियुक्त करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ४ महिन्यांसाठी मानधन तत्वावर प्रशिक्षित ‘आपदा मित्र’ पथकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.बडोदा (गुजरात) येथे झालेल्या २१ दिवसांच्या राष्ट्रीय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात जळगाव जिल्ह्यातील ४ ‘आपदा मित्र’ सहभागी झाले होते. त्यांनी यशस्वीरित्या 'मास्टर ट्रेनर' म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले.
तहसीलदार नानासाहेब आगळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांच्या हस्ते या प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्सना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.जामनेर तालुक्यातील सर्व 'आपदा मित्र' यावेळी उपस्थित होते.ही कार्यवाही प्रशासनाची आगामी मान्सूनातील आपत्ती परिस्थितींना तोंड देण्यासाठीची सज्जता अधोरेखित करते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा