रक्तदानातून मानवतेची जोपासना — शिबिरास मोठा प्रतिसाद - दैनिक शिवस्वराज्य

रक्तदानातून मानवतेची जोपासना — शिबिरास मोठा प्रतिसाद

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
चला रक्तदान करूया......जीवनदान देऊया  या प्रेरणादायी घोषवाक्याला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 6 एप्रिल 2025 रोजी, रविवारच्या दिवशी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीलिला हॉस्पिटल, जामनेर तर्फे महारक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकुमार सपकाळे यांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवत शिबिराच्या यशस्वितेत आपले योगदान दिले.या उपक्रमास राहुल साबळे मित्र परिवार, जामनेर आणि जयंती समिती अध्यक्ष राजकुमार सपकाळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सामाजिक सलोखा, मानवता आणि आरोग्यदायी समाजनिर्मितीचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये हे शिबिर एक आदर्श ठरले असून, आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads