हिवरखेडा-वाघूर मेजाय रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भव्य भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

हिवरखेडा-वाघूर मेजाय रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भव्य भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते संपन्न

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुका – हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) या महत्त्वपूर्ण मार्गाचे डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रस्त्याचा उपयोग वाघूर उपसा सिंचन योजना, जामनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी होतो, त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण हे अत्यंत आवश्यक होते.

सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे डांबरीकरण काम सध्या सुरू होत असून, यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला वाघूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंते गोकुळ महाजन व विनोद पाटील, उपविभागीय अभियंता अमोल कुमावत यांनी तांत्रिक माहिती दिली.

यावेळी पंचायत समितीचे भाजप गटनेते अमर शिवाजीराव पाटील, हिवरखेडा गावचे सरपंच देविदास दशरथ जोहरे, पोलीस पाटील लिलाधर मालखेडे, माजी सरपंच डॉ. रमेश पाटील, अमोल सुधाकर पाटील, उमेश महाजन, विकास सोसायटी चेअरमन अरुण शंकर चौधरी, तसेच चिचखेडा येथील बापू पाटील, नामदेव झावरे, सुभाष जासुद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे जामनेर तालुक्यातील पायाभूत सुविधा बळकट होत असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads