भाजपच्या जामनेर मंडल अध्यक्षपदी नव्या शिलेदारांची निवड; मंत्री गिरीश महाजनांकडून अभिनंदन
भारतीय जनता पार्टीच्या जामनेर तालुक्यातील तीन मंडल अध्यक्षपदांवर नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, जामनेर पूर्व मंडल अध्यक्षपदी श्री. मयूर पाटील, शहर मंडल अध्यक्षपदी श्री. रवींद्र झाल्टे आणि पश्चिम मंडल अध्यक्षपदी श्री. कमलाकर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या निवडीबद्दल राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नव्या अध्यक्षांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.जामनेर तालुका हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या नव्या नेतृत्वामुळे पक्षसंघटना आणखी बळकट होणार असून, आगामी काळात भाजपचा झेंडा अधिक उंचीवर जाईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.ते म्हणाले, हे नवे शिलेदार कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतील आणि पक्षाच्या धोरणांनुसार कार्य करत जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील.या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजपची जडणघडण आणखी मजबूत होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा