जामनेर येथे आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहाय्यक अभियंता श्री. सुरेश चासकर यांचा सन्मानमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
जामनेर येथे काही दिवसापूर्वी घडलेली दोन मजली इमारत कोसळण्याची घटना अत्यंत धक्कादायक ठरली. या दुर्घटनेनंतर, मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जामनेर येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १ श्री. सुरेश चासकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या समन्वयाने त्यांनी केलेल्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, मान्यवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्री. चासकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. श्री. सुरेश चासकर यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा