गोंडखेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे जल्लोषात उद्घाटन
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोंडखेड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या शुभहस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी रवी बाविस्कर, मुकुंद बाविस्कर, एकनाथ सपकाळे, दत्ता अहिरे यांसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. कार्यक्रमात एकमताने अजय बाविस्कर यांची शाखाध्यक्षपदी, राहुल बाविस्कर यांची उपाध्यक्षपदी आणि महेंद्र साबळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सभागृह उत्साही घोषणांनी आणि जयभीमच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.
नवीन कार्यकारिणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत सामाजिक परिवर्तन साधण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा