नाडगावची वि.जा. भ.ज. प्राथमिक आश्रम शाळा भरारी – 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्यात ठरली आदर्श
30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेचे औचित्य साधून 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' या उपक्रमाचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात बोदवड तालुक्यातून वि.जा. भ.ज. प्राथमिक आश्रम शाळा नाडगाव या शाळेने द्वितीय क्रमांक मिळवून शैक्षणिक, सामाजिक आणि भौतिक उन्नतीचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील (मुक्ताईनगर) होते. प्रमुख अतिथी म्हणून बोदवड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री आनंदा पाटील, न.ह. राका हायस्कूलचे चेअरमन श्री मिठूलालजी अग्रवाल, विकास कोटेजा, गटशिक्षणाधिकारी श्री लहासे साहेब, गटविकास अधिकारी श्री रमेश जी सपकाळे साहेब, तसेच सर्व केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील, श्री नितीन भंगाळे, श्री गोपाल पाटील, श्री चंद्रकांत फिरके सर, सौ. चौधरी मॅडम, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
गेल्या वर्षी तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या या शाळेने यंदा मोठी प्रगती साधून द्वितीय क्रमांक पटकावला. यामागे शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचे सातत्य, चिकाटी आणि संघटन आहे.
या यशाचे श्रेय जाते संस्थेचे चेअरमन डॉ. जी. एन. पाटील साहेब, मामासो. गजेंद्रसिंग सिसोदिया, माजी मुख्याध्यापक बोरसे सर, सध्याचे मुख्याध्यापक वाघ सर, अधीक्षक पाटील सर, शिक्षक मराठे सर, शेखावत मॅडम, सोहिल सर, पूजा सोनवणे मॅडम, तसेच मंगल भाऊ कोळी आणि राकेश बोरसे या सर्व कर्मचाऱ्यांना.
शाळेतील प्रगत भौतिक व शैक्षणिक सुविधा
सोलर पावर सिस्टीम, सोलर वॉटर हीटर
इन्व्हर्टर, अग्निशामक यंत्र, CCTV कॅमेरे
संगणक कक्ष, टीव्ही, एक्वागार्ड, प्रशस्त भोजन कक्ष
स्वच्छ व सुसज्ज शौचालय व बाथरूम
खेळ साहित्य: खो-खो, कबड्डी, क्रिकेट किट, लेझीम, डंबेल्स
गणित, विज्ञान, इंग्रजी, भाषा शैक्षणिक पेट्या व साहित्य
400 ते 500 फुलझाडे व वृक्षांची लागवड
विविध प्रकारचा भाजीपाला असलेली परसबाग
गुणवत्ता आणि संस्कारांची सांगड
शाळेतील ९०% विद्यार्थी वाचन, लेखन, संख्याज्ञान, पाढे, गणितीय क्रिया या बाबतीत प्रगतीशील आहेत. दररोज परिपाठ व सामुदायिक प्रार्थना घेतली जाते. अधीक्षक श्री पाटील सर, मंगल भाऊ कोळी आणि राकेश बोरसे हे विद्यार्थ्यांचा दररोज अभ्यास घेतात व त्यांना चांगले संस्कार देतात.
या शाळेचा स्वच्छ, सुंदर व निसर्गरम्य परिसर, शिस्तप्रिय वातावरण आणि प्रगत सुविधा यामुळेच बोदवड तालुक्यातील अन्य शाळांसाठी ती आदर्श ठरली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा