महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासाची नवी दिशा जळगांव जिल्हाधिकारी व सीईओंचे ग्रामपंचायतींना आवाहन..
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकासाची नवी दिशा देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी महत्वपूर्ण पत्रक जारी केले आहे. या पत्रकात ग्रामविकासाशी निगडित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या मोहिमेंतर्गत खालील गोष्टींवर विशेष भर देण्यात येणार आहे :
- मतदार यादीची तपासणी : नागरिकांनी आपली नोंदणी झाली आहे का, याची खात्री करणे.
- शासकीय योजनांचा लाभ : पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे.
- शेतकरी ओळखपत्र व ई-पिक पाहणी : शेतीविषयक माहिती अद्ययावत ठेवणे.
- स्वच्छता व कचरा व्यवस्थापन : स्वच्छ भारत अभियानाला बळ देणे.
- जलतारा कामे व जलस्रोत बळकटीकरण : पाणीटंचाईला पर्याय शोधणे.
- सौरऊर्जा प्रकल्प : पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास चालना.
- घरगुती नळ जोडणी : प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा.
- मनरेगा कार्ड वाटप : रोजगार हमी योजनेचा लाभ.
- पावसाचे पाणी साठवणे : जलसंधारणासाठी उपयुक्त उपाययोजना.
या योजनांची ग्रामसभेत चर्चा करून स्थानिक पातळीवर त्वरित अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा