महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचा सन्मान; जामनेर पंचायत समितीने मिळवले विकासात दुहेरी यश - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचा सन्मान; जामनेर पंचायत समितीने मिळवले विकासात दुहेरी यश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जामनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद क्षण पंचायत समिती जामनेर ने यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान 2023-24 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक आणि नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या कामगिरीबद्दल पंचायत समिती जामनेरला राज्यस्तरीय पुरस्कार म्हणून 17 लाख रुपयांचा निधी, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकासाठी 11 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मलबार हिल, मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा गौरव महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, ग्रामविकास मंत्री, तसेच प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार गटविकास अधिकारी श्री. श्रीकृष्ण इंगळे, विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री. अशोक पालवे, तसेच कनिष्ठ प्रशासनाधिकारी श्री. केशवराव जाधव यांनी पंचायत समिती जामनेरच्या वतीने स्वीकारला.

या गौरवप्रसंगी शिवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नितीन इंगळे यांच्याशी बोलताना गटविकास अधिकारी श्री. इंगळे साहेब म्हणाले,हा सन्मान पंचायत समिती जामनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे आणि तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहकार्याचे प्रतीक आहे. गावागावातील ग्रामपंचायती, अधिकारी, कर्मचारी, आणि नागरिक यांनी मिळून उभारलेल्या विकास कामांचा हा गौरव आहे. हा पुरस्कार आम्हाला अजून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.जामनेर पंचायत समितीच्या या यशाबद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गटविकास अधिकारी श्री. इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने ग्रामीण विकासाची नवी दिशा ठरवली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads