अहिल्याबाईंनी सर्व समाजासाठी कार्य केले - एडवोकेट सुचिताताई हाडा यांचे विचार
जामनेर, दि. ३० मे - "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून प्रजाजनांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. त्यांनी केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने समाजहिताचा विचार केला. बारा ज्योतिर्लिंगांसह अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार स्वतःच्या पैशातून केले, हा त्यांचा दृष्टीकोन आजही आदर्शवत आहे," असे विचार एडवोकेट सुचिताताई हाडा यांनी व्यक्त केले.
अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने जामनेर येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) यांच्यातर्फे प्रेरणावंत बुद्धिजीवी प्रेरणा संवाद हा कार्यक्रम एकलव्य माध्यमिक शाळेत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जेष्ठ नेते एडवोकेट शिवाजी सोनार, संजय गरुड, गोविंद अग्रवाल, अजय भोळे, नवलसिंग पाटील, आतिश झाल्टे, अनंत कुलकर्णी, हरलाल कोळी, प्रदीप लोढा, रवींद्र झाल्टे, मयूर पाटील, कमलाकर पाटील, प्रा. शरद पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, डॉ. संजीव पाटील, अमित देशमुख, राजधर पांढरे, अमोल देशमुख, योगेश मोते, दीपक पाटील, सुहास पाटील, कैलास पालवे, सुभाष पवार, हरीश पर्वते, प्रमोद सोनवणे, आदी डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजिनिअर्स, प्रमुख पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी केले, तर आभार मयूर पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंग पाटील, गोविंद अग्रवाल आदींनीही आपले विचार व्यक्त केले.एडवोकेट सुचिताताई हाडा यांनी आपल्या भाषणात अहिल्याबाईंच्या जीवनकार्याचा विविध पैलूंनी ऊहापोह केला. त्यांनी अहिल्याबाईंच्या कार्यातून आजच्या समाजाला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोत्यांना नवचैतन्याची ऊर्जा दिली.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजिनिअर्स, प्रमुख पदाधिकारी, नागरिक यांची मोठी उपस्थिती लाभली होती. अहिल्याबाईंच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजहितासाठी एकत्र येण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा