मुदखेडा येथील सुमारे 30 वर्षीय तरुणाने जंगलात विष प्राशन करून आत्महत्या केली; रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच मृत्यू
जामनेर तालुका – मुदखेडा येथील आकाश सोनवणे या भिल समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनवणे जंगलात जाऊन विष घेतले. बराच वेळ तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता तो अर्धमूच्र्छित अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने मुदखेडा गावात शोककळा पसरली आहे. आकाश हा स्वभावाने शांत व मनमिळावू होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा