यावल-रावेर मतदारसंघातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावामा. आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक - दैनिक शिवस्वराज्य

यावल-रावेर मतदारसंघातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावामा. आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
यावल/रावेर – यावल व रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन पाणी तसेच औद्योगिक वापरासाठी जलस्रोतांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यावल-रावेरचे आमदार मा. अमोल हरिभाऊ जावळे हे होते.

या उच्चस्तरीय आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. यशवंतराव भदाणे, तसेच विभागातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

बैठकीत पुढील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा नियमित व गुणवत्तापूर्ण पुरवठा

शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा विस्तार व कार्यक्षमतेत वाढ

औद्योगिक विकासासाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तातडीच्या उपाययोजन आमदार अमोल जावळे यांनी स्पष्टपणे सांगितले, "जनतेच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणे हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. प्रत्येक शेतकरी व नागरिकाला वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
ही बैठक जलसंपदा प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देणारी, पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढवणारी ठरली असून, यावल-रावेर परिसरातील पाणी प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads