महाराष्ट्र
लोकसेवा विद्यामंदिर मंद्रूप प्रशालेचा एस.एस.सी परीक्षेचा निकाल 87.43%
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्याच्या ग्रामीण विभागातील मंद्रूप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रूप संचलित लोकसेवा विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सन 2024-25 च्या एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत प्रशालेचा निकाल 87.43 % लागला.
🔴 सेमी माध्यमचा निकाल 100% असून यामध्ये कु. स्वरांजली देवानंद महामुनी ही 99.20% गुण घेऊन प्रशालेत, केंद्रात, तालुक्यात प्रथम तर कु. गौरी सुभाष लोभे ही 98.20% गुण घेऊन केंद्रात व तालुक्यात द्वितीय क्रमांक आणि कु.सृष्टी धरेप्पा अरबळे ही 95.60% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविले आहेत. त्याचप्रमाणे प्रशालेचा मराठी माध्यमचा निकाल 81.15% लागला असून प्रथम क्रमांक कु. निकिता हुक्केरी 83.40% ,तर द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी सुतार 83.20% आणि तृतीय क्रमांक कु.वैष्णवी खरात 80.80% गुण घेतलेले आहेत
कु. स्वरांजली महामुनी ही तालुक्यात उच्चांक गुणांनी उत्तीर्ण झाली आहे
इ.10 वी बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष योग्यता 33 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 55 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 73 विद्यार्थी, तृतीय श्रेणीत 20 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील, सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्धमामा म्हेत्रेसाहेब, सहसचिव तथा माजी युवा सरपंच आप्पासाहेब म्हेत्रे, समस्त संचालक वर्ग,प्राचार्य तथा मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर सर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद घाटे, श्री मल्लिकार्जुन वस्तीगृहाचे अधीक्षक श्रीशैल म्हेत्रे सर, व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तथा ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा