जातीनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारचा निर्णय –जामनेरमध्ये जल्लोषात आभार प्रदर्शन
जामनेर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, जामनेर शहर मंडळाच्या वतीने नगरपालिका चौकात जल्लोषात आभार प्रदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात जल्लोष करताना ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडण्यात आले व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे नेतृत्व मा.ना. गिरीशभाऊ महाजन यांनी केले.यावेळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये अतिश झाल्टे, डॉ. प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, श्रीराम महाजन, रविंद्र रमेश झाल्टे, नामदेव पालवे, बाबूराव हिवराळे, शेख अनीस बिस्मिल्ला, कैलास नरवाडे, खालील भांजा, रतन गायकवाड, सुरेश माळी, दिपक मिस्तरी, संजय सूर्यवंशी, गणेश चौधरी, पप्पू लुंकड, योगेश मोते, कमलेश जैन, दत्तू जोहरे, गणेश मिस्तरी, बाळू चव्हाण, दिपक माळी यांचा समावेश होता.
या वेळी आजी-माजी पदाधिकारी व विविध विभागातील कार्यकर्तेही उपस्थित होते. 'धन्यवाद मोदीजी' आणि 'जातीनिहाय जनगणना हवीच' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा