ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करताना एक जेरबंद; फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई - दैनिक शिवस्वराज्य

ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करताना एक जेरबंद; फत्तेपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
फत्तेपूर, ता. जामनेर – अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला.

या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत.

या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads