साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी या प्रशालेचा दहावी चा निकाल 75. 75 टक्के... - दैनिक शिवस्वराज्य

साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी या प्रशालेचा दहावी चा निकाल 75. 75 टक्के...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर या प्रशालेचा निकाल 75. 75% लागला असुन यामध्ये 
🔴 प्रथम क्रमांक : - शेख झिहत इनायतआली 79.80%
🔴द्वितिय कृमांक :- शेख महेक महिबूब 77=60%
🔴तृतीय कृमांक :- यलडगी फिरदोस मोदीन 77.40%   
 व तसेच यावर्षीच्या प्रशालेच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे 17 नंबर चा निकाल शंभर टक्के लागला आहे.प्रशालेस इयत्ता दहावी व बारावी 17 नंबर फॉर्म भरण्याची मान्यता याचवर्षी मिळाली आहे. यावर्षी स्वाती भगवान लालगे उर्फ (श्रीमती स्वाती यमुनोरी देवगिरीकर) या 17 नंबर फॉर्म भरून उत्तीर्ण झालेल्या आहेत. विशेष म्हणजे याच वर्गातून त्यांची मुलगी कु .विद्या येमनुरी देवगिरीकर ही 10 वी उत्तीर्ण झाल्याने आई व मूलगी एकत्र उत्तीर्ण होण्याचा आनोखा संगम साने गुरुजी विद्यामंदिर या प्रशालेत घडल्याने त्या दोघींचे सर्वत्र कौतूक होऊन अभिनंदनाच वर्षाव होत आहे. 
     या व सर्व एस.एस.सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंत्रोळी संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर व संस्थेचे सचिव भिमराव परिक्षाळे व साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंत्रोळी संस्थेचे सर्व संचालक मंडळाकडून आणि प्रशालेकडून अभिनंदन केले. तसेच दैनिक शिवस्वराज चे सहसंपादक पत्रकार समीर शेख याच्याकडुन हार्दिक अभिनंदन व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads