वादळी वाऱ्यांमुळे हिवरखेडे बु. येथे केळी पिकांचे मोठे नुकसान; प्रांताधिकाऱ्यांकडून तत्काळ पंचनाम्याचे आदेश - दैनिक शिवस्वराज्य

वादळी वाऱ्यांमुळे हिवरखेडे बु. येथे केळी पिकांचे मोठे नुकसान; प्रांताधिकाऱ्यांकडून तत्काळ पंचनाम्याचे आदेश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
हिवरखेडे बु., ता. जामनेर | ७ मे २०२५
जामनेर तालुक्यात  (दि. ६ मे) सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे मौजे हिवरखेडे बु. परिसरातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीत केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
घटनेनंतर लगेचच प्रशासन हरकत घेत, उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी, तहसीलदार जामनेर, तालुका कृषी अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकसानीची पाहणी केली.

पाहणीनंतर प्रांताधिकारी गोसावी यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून, आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी संयम बाळगावा व प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीची वाट पहावी, असे आवाहन स्थानिक अधिकाऱ्यांनी केले आहे.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads