जामनेरात ठाकरे गट शिवसेनेला सोडचिट्टी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोरसे, संचालक नाना पाटील अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश
जामनेर तालुक्यातील राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोरसे आणि जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेला रामराम ठोकत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट प्रवेश केला. या पक्षांतरामुळे शिवसेनेला जामनेरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
दिनांक 3 मे रोजी मुंबईत पार पडलेल्या माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमातच बोरसे आणि पाटील यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया,
जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार,
रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,
तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे जामनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित गट) आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.दुसरीकडे, या गटबाजीमुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मात्र या प्रवेशामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा