मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन — तपोवन मंडळात लोकोपयोगी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक :मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण करत भारतीय जनता पार्टीच्या तपोवन मंडळातील सर्व सहकाऱ्यांनी एक आगळीवेगळी भेट दिली. महाजन यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून सर्व रक्तदात्यांचे मन:पूर्वक आभार मानले. सामाजिक भान जपणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अशा उपक्रमांमुळेच वाढदिवसाचा खरा अर्थ खुलतो, असे सांगत त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवत आपले रक्तदान करत सामाजिक भान जपले. मंत्री महाजन यांनी या लोकोपयोगी उपक्रमामुळे आपला वाढदिवस अधिकच खास झाल्याचे सांगत सर्वांचे अभिनंदन केले.
हाच खरा जनसेवेचा मार्ग असल्याचे प्रतिपादन करत उपस्थित कार्यकर्त्यांनीही भविष्यात अशा उपक्रमांची सातत्याने आखणी करणार असल्याचे सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा