भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर' ला सलाम! जळगावात भव्य तिरंगा रॅलीतून शौर्याला मानवंदना
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. भारतीय लष्कराने जनतेच्या भावनेचा आदर राखत थेट पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' राबवून प्रत्युत्तर दिले. या अद्वितीय शौर्याची दखल घेत जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या तिरंगा रॅलीत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः सहभागी होत "भारत माता की जय" आणि "जय हिंद" अशा राष्ट्रभक्तीपूर्ण घोषणांनी जनतेच्या मनात देशभक्तीचा स्फुरण निर्माण केला. रॅलीदरम्यान लष्कराच्या पराक्रमाला मानवंदना देत नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रॅलीला खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री. सुरेशमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. संपूर्ण जळगाव शहरातून हजारो नागरिक या रॅलीत सहभागी झाले.
या आयोजनाच्या निमित्ताने जळगावकरांनी भारतीय लष्कराच्या शौर्याला, त्यागाला आणि राष्ट्रसेवेला कृतज्ञतेन नमन केले.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा