मंत्री गिरीश महाजन गोंडखेड येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी; शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही - दैनिक शिवस्वराज्य

मंत्री गिरीश महाजन गोंडखेड येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी; शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही


जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुका सहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रस्तावावरून संतप्त शेतकऱ्यांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. गोंडखेड आणि परिसरातील शेतकऱ्यांनी कारखाना विक्रीला ठाम विरोध दर्शवत, "जमिनी कुणालाही विकू नका, आम्हालाच परत द्या" अशी ठाम भूमिका मंत्री महाजन यांच्यासमोर मांडली.
रंजीत शेनफडू राजपूत, प्रभू शेनफडू राजपूत, अर्जुन चोपडे, भगवान चोपडे, जगतसिंग परदेशी, संजय परदेशी, विजय परदेशी, शांताराम जाधव, रवींद्र चोपडे, विलास परदेशी, शांताराम पाटील, मधुकर पाटील, रणजीत पाटील, सिताराम मगर, ईश्वर मगर, भगत राजपूत, भगतसिंग परदेशी, सयाबाई तुकाराम, बन्सीलाल राजपूत, संग्रामसिंग राजपूत आदी शेतकऱ्यांनी मंत्री महाजन यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना धीर देत स्पष्ट शब्दांत सांगितले 
"मी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींच्या हक्कावर गदा येऊ देणार नाही. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणतीही चिंता करू नका.

यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि तक्रारी मांडताना सांगितले की, ३२ वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. जमिनी विक्रीचा प्रस्ताव हा अन्यायकारक आहे, त्यामुळे जमिनी आम्हालाच परत द्या, आम्ही बाजारभावाने घेऊ, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांनी यापूर्वीही जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदने दिली असून, आता मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडा दिलासा मिळाला असला तरी "खरंच आमच्या जमिनी परत मिळणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले 
"मंत्री महाजन यांचा शब्द आम्हाला आधार देणारा आहे, मात्र आता निर्णय कारखाना कमिटीवर आणि प्रशासनावर आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे आमचे डोळे लागले आहेत."शेतकरी आंदोलन आता अधिक उग्र होण्याची शक्यता असून, जमिनी परत मिळेपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच राहणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads