अनिल थत्तेचा खोटारडेपणा कोर्टात फोल.. सर्वोच्च न्यायालयाचा गिरीश महाजन यांच्या बाजूने निर्णायक निकाल, खडसे गटाला जबर धक्का - दैनिक शिवस्वराज्य

अनिल थत्तेचा खोटारडेपणा कोर्टात फोल.. सर्वोच्च न्यायालयाचा गिरीश महाजन यांच्या बाजूने निर्णायक निकाल, खडसे गटाला जबर धक्का

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
राजकीय कटकारस्थानाचा पर्दाफाश करत, सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेले बदनामीकारक आरोप फेटाळून लावत अनिल थत्तेच्या सर्व व्हिडिओ हटविण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय केवळ कायदेशीर विजय नाही, तर महाजन यांच्या राजकीय प्रामाणिकतेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचा पुरावा आहे.
थत्तेचा अपप्रचार आणि खडसेंचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप निष्फळ!
अनिल थत्तेच्या माध्यमातून सोशल मीडियावर पेरलेले आरोप हे निव्वळ अफवा आणि अपप्रचार होते, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी थत्तेसारख्या युट्यूबर्सचा वापर करून महाजन यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न आता न्यायालयाने जमीनदोस्त केले आहेत.
महाजन – लोकनेते, विकासदृष्टी असलेला चेहरा
गिरीश महाजन यांनी ग्रामीण भागात केलेल्या भरीव कामामुळे ते केवळ मंत्रीच नव्हे, तर जनतेचा विश्वासार्ह नेता ठरले आहेत. जलसंपदा, शेती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांतील त्यांच्या योजनांना व्यापक जनसमर्थन लाभले आहे. त्यामुळे विरोधकांचे वैयक्तिक द्वेषातून केलेले आरोप न्यायालयासमोर टिकले नाहीत.
कार्यकर्त्यांचा विजय – विरोधकांचं तोंड काळं
भाजप कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने दाखवलेल्या एकसंघ पाठिंब्यामुळे हे प्रकरण न्यायव्यवस्थेने गांभीर्याने घेतले. महाजन यांचं जनतेशी असलेलं नातं, त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि लोकहितासाठी केलेली कामगिरी यामुळे न्यायालयाने देखील त्यांच्यावरचा विश्वास अधोरेखित केला.
हा निर्णय केवळ एक न्यायालयीन निकाल नाही, तर तो आहे सत्य आणि प्रामाणिक नेतृत्वाचं पुन्हा एकदा झालेलं विजयश्रीने स्वागत


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads