गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक :- गणेश चिंचोले - दैनिक शिवस्वराज्य

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक :- गणेश चिंचोले

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने आयोजित चर्चासत्रात प्रतीमेस अभिवादन करताना विश्वस्त गणेश चिंचोले, चित्रा चिंचोले, डॉ अस्मिता बालगावकर, डॉ राजेंद्रसिंह लोखंडे व मान्यवर.

समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे यासाठी त्यांनी संघर्ष केला म्हणूनच आज त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत असे प्रतिपादन असे गणेश चिंचोले मुंबई अनिस महाराष्ट्रचे विश्वस्त यांनी केले. रयत शिक्षण संस्थेस त्यांनी अनेक पुस्तके भेट म्हणून दिली. 
    सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मलक्ष्मी सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात हे बोलत होते. विचारपीठावर संतोष वालवडकर, अमर देशमुख, संभाजी दीक्षित वसंत नागणे, डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ अस्मिता बालगावकर, सरिता मोकाशी, मधुरा सलवारू, निशा भोसले उपस्थित होते.
     शहीद जवानांना तसेच आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वांनी आम्ही प्रकाशबिजे गीत सामूहिकपणे गायले. चर्चासत्राचा शुभारंभ पाण्याचा दिवा प्रज्वलित करून करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांच्या विचारांप्रमाणे सर्वांनी एकमेकांना राख्या बांधून बंधुतेचा संदेश दिला. त्यानंतर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित माहिती पट दाखविण्यात आले. 
   चर्चासत्रात डॉ अस्मिता बालगावकर यांनी रविंद्रनाथ टागोरांवर तर एडवोकेट सरिता मोकाशी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर आधारित व्याख्यान दिले. टागोरांच्या कविता गाणी म्हणण्यात आली. पाहुण्यांची ओळख निशा भोसले यांनी केली. आभार प्रदर्शन लता ढेरे यांनी केले. चर्चासत्रासाठी रयतचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि अनिस कार्यकर्ते आर डी गायकवाड, अरुण गायकवाड, लता ढेरे, सुनीता गायकवाड, शकुंतला सुर्यवंशी, चित्रा चिंचोले, संजीवनी देशपांडे, डॉ निलेश गुरव इ सह १०० लोक उपस्थित होते.
🔴समाजातील रूढी परंपरा चंगळवाद या विरुद्ध लढा उभा करणार..
    समाजामध्ये अजुनही विज्ञानिक दृष्टीकोण व महापुरुषांचे विचार रुजवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त प्रमाणात तरूण पिढीने चळवळीमध्ये सक्रिय होवून सामाजिक कार्य आणि प्रबोधन केले पाहिजे. वाचन संस्कृती तरुण पिढीत रुजवली पाहिजे असे गणेश चिंचोली यांनी सांगितले


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads