सोनाळा फाट्यानजीक भीषण अपघात; एक ठार, नऊ जण जखमी... - दैनिक शिवस्वराज्य

सोनाळा फाट्यानजीक भीषण अपघात; एक ठार, नऊ जण जखमी...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर-पहूर महामार्गावर सोनाळा फाट्याजवळ आज रविवारी दुपारी सुमारास भीषण अपघात झाला. लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱ्या क्रुझर वाहनाचा कट मारल्यामुळे अपघात होऊन वाहन पलटी झाले. या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.
लाहसर रामपुर तांडा (ता. जामनेर) येथील वऱ्हाडीयांनी फरदापूर तांडा, ता. सोयगाव, जि. संभाजीनगर येथे परतत असताना समोरून आलेल्या वाहनाने अचानक कट मारल्याने त्यांची क्रुझर गाडी पलटी झाली. या अपघातात दशरथ रतन चव्हाण (वय 72) हे जागीच ठार झाले.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे:

लखिचंद शंकर चव्हाण (वय 50)

मोहनदास शंकर जाधव (वय 50)

विक्रम मोतीलाल चव्हाण (वय 25)

बाबू पांचु जाधव (वय 75)

उखा दलू राठोड (वय 65)

धिरलाल सदू राठोड (वय 65)

हिरा महारु चव्हाण (वय 58)

प्रतीक प्रवीण राठोड (वय 7)

भिवसिंग मनूर चव्हाण (वय 75)


सर्व जखमींना तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या घटनेनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे आणि शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गणेश पांढरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतीसाठी पुढाकार घेतला. नागरिकांनी सुद्धा मदत केली.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास सुरू आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads