जामनेर तालुक्यात दोन ठिकाणी अपघात: एका दिवसात दोन मृत्यू, एक गंभीर जखमी शहापूर रोड व भवानी घाट येथे दुर्घटना
वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार
जामनेर (ता. १० मे): जामनेर तालुक्यात आजच्या दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांनी तालुक्यात खळबळ उडवली आहे. एका दिवसात दोन जणांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पहिली घटना जामनेर – शहापूर रोडवर घडली. चिखली येथील युवक राहुल रामदास सुरासे याचा अपघातात मृत्यू झाला.
दुसरी दुर्दैवी घटना भवानी घाटात घडली, जिथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एक अनोळखी व्यक्ती जागीच ठार झाला असून, दुसऱ्या दुचाकीवर असलेले सुनील सुरेश पवार (वय ३५, रा. धोबी वराड, शिरसोली) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ आरोग्यदूत श्री. जालमभाऊ राजपूत व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांत मोठी चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही अपघातांबाबत तपास सुरू आहे. मृत व्यक्तींच्या ओळखीची अधिकृत माहिती लवकरच समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा