जामनेरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी; विजांचा कडकडाट अन् जोरदार वाऱ्याचे थैमान - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी; विजांचा कडकडाट अन् जोरदार वाऱ्याचे थैमान

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर : शहरात आज दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले आणि पाहता पाहता मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला. काल रात्री देखील पावसाने अचानक आगमन करून नागरिकांना भिजवले होते, तर आजच्या पावसाने शहरवासीयांना आणखी एकदा गारठवून टाकले. शहरातील वीज पुरवठा पण खंडित झाला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गही चिंतेत असून, सध्या उभ्या पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अजूनही काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads