हवामान इशारा : विजांसह मेघगर्जना व झंझावाती वाऱ्यांची शक्यता – नागरिकांनी सतर्क राहावे
जळगाव | हवामान विभागाने नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यांसाठी तातडीचा हवामान इशारा जारी केला आहे. पुढील ३ ते ४ तासांमध्ये या भागांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलक्याशा सरी आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने झंझावाती वारे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी घ्याव्यात पुढील दक्षता
उघड्यावर वीज चमकत असताना थांबू नका
झंझावाती वाऱ्याच्या वेळी झाडांखाली थांबणे टाळा
प्रवास सुरू असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा
मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित करा
हवामानातील या अचानक बदलामुळे जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक आहे. प्रशासनानेही याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा