राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात जळगाव जिल्ह्याचा भव्य सन्मान – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
मुंबई | ७ मे २०२५ – राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत आज मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात जळगाव जिल्ह्याचा भव्य सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, राज्य मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्रीगण, जिल्ह्याचे पालकसचिव तथा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री. राजेशकुमार, तसेच विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा गौरव करताना, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीला मान्यता मिळाली आहे.
कार्यक्रमात खालील अधिकारी विशेष उल्लेखनीय ठरले
अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे
उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) श्री. विजयकुमार ढगे
तहसीलदार श्रीमती उमा ढेकळे
स्वीय सहायक श्री. मिलींद बुवा
या यशासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले की, नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू आणि प्रशासनात पारदर्शकता व परिणामकारकता ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा