महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने शेळगाव येथील मा. उपसरपंच निळकंठ पाटील सन्मानीत - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने शेळगाव येथील मा. उपसरपंच निळकंठ पाटील सन्मानीत

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने शेळगाव येथील मा. उपसरपंच निळकंठ पाटील सन्मानीत जामनेर तालुक्यातील शेळगाव येथील माजी उपसरपंच निळकंठ वसंतराव पाटील यांना मलकापूर येथे निलेश जी तायडे सहाय्यक माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण न्युज वहिनी मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा कार्य करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2025 आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रात काम केलेल्याचे ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त१३५६ प्रस्तावापैकी 60 मान्यवरांची निवड करुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल निळकंठ पाटील यांना मलकापूर येथे महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रावेर लोकसभा संपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, तालुक्याचे नेते डि.के.दादा पाटील, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाप्रमुख किशोर पाटील, शेतकरी नेते डॉक्टर प्रशांत पाटील, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मुलचंद नाईक, मराठा सेवा संघाचे आबासाहेब पाटील, सामाजिक न्याय विभागाची तालुकाप्रमुख व सोनाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच नंदुभाऊ इंगळे,मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, युवा नेते विश्वजीत पाटील. विकास अहीरे,हरीष पायघोण आदीनी त्यांचे अभिनंदन केले
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads