कसबापिंप्री वि.का. सोसायटीच्या चेअरमनपदी सुधाकर पाटील यांची एकमताने निवड — सहकार क्षेत्रातील एक शैक्षणिक व अनुभवी चेहरा पुढे
दि. २३ मे २०२५
कसबापिंप्री (ता. जामनेर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. सुधाकर बाबूराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. माजी चेअरमन स्व. धनराजभाऊ बदर यांच्या निधनाने निर्माण झालेल्या रिक्त जागेवर ही निवड पार पडली.या निवडीने केवळ संस्थेला नवे नेतृत्व मिळाले नाही, तर सहकार क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊलही टाकले गेले आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजवर प्रथमच एम.ए., एम.कॉम., बी.पी.एड. अशा उच्च शिक्षणासह पतसंस्थेतील मॅनेजर म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेली आणि संचालक मंडळातील एकमेव निल असलेली व्यक्ती चेअरमनपदी विराजमान झाली आहे.श्री. पाटील यांच्या निवडीचे जिल्हा पातळीवरही विशेष स्वागत करण्यात आले आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या सामाजिक उपक्रमाशी संबंधित कार्यकर्ते व जिल्हा सदस्य श्री. राजेंद्र किटे यांनी नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुधाकर पाटील यांचे तसेच ही बिनविरोध निवड यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संचालक मंडळाचे, निवडणूक निर्णय अधिकारी, सचिव व सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ही निवड केवळ एक औपचारिकता नसून, सहकार चळवळीला शिक्षण व अनुभवाच्या बळावर सक्षम दिशा देणारे पाऊल आहे.संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गावातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात नव्या योजना, पारदर्शक कार्यपद्धती आणि शेतकरी केंद्रित उपक्रमांची अपेक्षा या नेतृत्वाकडून व्यक्त केली जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा