जामनेर तहसील कार्यालयाचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक, तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा गौरव - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तहसील कार्यालयाचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक, तहसीलदार नानासाहेब आगळे यांचा गौरव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर: मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत नाशिक महसूल विभागातील विविध तहसील कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये जामनेर तहसील कार्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा गौरव मिळविण्यात तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे नेतृत्व, त्यांची कार्यनिष्ठा आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व विभागीय आयुक्त मा. श्री प्रविण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या यशामुळे जामनेर तहसील कार्यालयाचे सर्व स्तरांवर कौतुक होत असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी हा सन्मान सर्व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना दिला असून, नागरिकांच्या विश्वासाला नेहमीच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads