उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव दौरा; 'आदिशक्ती मुक्ताई' पालखी प्रस्थान सोहळ्यास होणार उपस्थिती
जळगाव, दि. ६ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिनांक ६ जून २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याचा महत्वाचा दौरा निश्चित झाला असून, 'आदिशक्ती मुक्ताई' पालखी प्रस्थान सोहळ्यास त्यांच्या उपस्थितीने विशेष महत्व प्राप्त होणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे –
आज दुपारी २.३० वाजता ते मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी ३.०० वाजता पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते विमानाने जळगावकडे रवाना होतील. दुपारी ३.४५ वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते थेट मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई मंदिरात पोहोचतील.
सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या 'आदिशक्ती मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यास उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे प्रस्थान सोहळा प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असल्याने परिसरात भक्तांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे.
यानंतर सायंकाळी ५.३० वाजता उपमुख्यमंत्री शिंदे मोटारीने जळगाव विमानतळाकडे परत जातील. सायंकाळी ६.१५ वाजता जळगाव विमानतळावरून ते शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
या संपूर्ण दौर्यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रशासनाची हालचाल वाढली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 'आदिशक्ती मुक्ताई'च्या पालखी सोहळ्याला यामुळे अधिक राजकीय व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा