मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेरात रुग्णसेवा व आदिवासी मुलांना पुस्तक वाटप - दैनिक शिवस्वराज्य

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेरात रुग्णसेवा व आदिवासी मुलांना पुस्तक वाटप

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर (दि. ५ जून २०२५) – महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुका शिवसेना व तालुका युवा सेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कोणताही अनाठायी खर्च न करता, उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी रुग्णसेवेला प्राधान्य देत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, शहरातील गोकुळधाम नगर परिसरातील आदिवासी चिमुकल्यांना बालभारतीची मराठी पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून, उपस्थितांनी व चिमुकल्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत मंत्री साहेबांच्या कार्याला शुभेच्छांचा वर्षाव केला.

या सेवाभावी उपक्रमासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कैलास माळी, शहरप्रमुख नरेंद्र धुमाळ, युवा सेनेचे विशाल लामखेडे, चेतन माळी, दिग्विजय यांच्यासह असंख्य शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads