शाळा परिसरात पंढरपूरचा अनुभव; शेरी येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी
शेरी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक पद्धतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि संतांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी यामुळे संपूर्ण परिसरात पंढरपूरची अनुभूती निर्माण झाली.
या दिंडीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच विठ्ठल-रुखमाईच्या वेषातील बालवारकऱ्यांनी सहभागी होत भक्तिभावाने संपूर्ण वातावरण भारून टाकले. शाळेच्या प्रांगणातून निघालेली दिंडी गावातून भ्रमण करत हरिनाम संकीर्तनात रंगली होती. गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांनीही या दिंडीत सहभाग नोंदवत संस्कृतीशी नाळ जोडली.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक गणेश राऊत, उपशिक्षक गोपाल पाटील व मंगला पाटील यांनी परिश्रम घेतले.
आधुनिक शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न म्हणून या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष स्वागत केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा