जामनेरात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरवकामकुचराई केल्यास कडक कारवाईचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत जामनेर तालुक्यात कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सन २०२४–२५ या वर्षात तालुक्यात एकूण १,१९५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. अध्यक्षीय भाषणात डॉ. भायेकर यांनी सांगितले की, “पुरुष नसबंदी ही स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा अधिक सुलभ व सोपी असून, कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे मत परिवर्तन करून पुरुष नसबंदीला प्रोत्साहन द्यावे.”
तसेच, कर्तव्यात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. कोमल देसले, डॉ. मोहित जोहरे, डॉ. संदीप कुमावत, डॉ. शारीक कादरी, डॉ. सागर पाटील, डॉ. दानिश खान, डॉ. हर्षल भटकर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र सुर्यवंशी यांनी केले तर डॉ. मोहित जोहरे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बशीर पिंजारी, गोपाल पाटील, त्र्यंबक तव्वर, सोनल पाटील, प्रदीप पाटील, सुयोग महाजन, सलील पटेल, आशा कुयटे, शिवली देशमुख, प्रतिभा चौधरी, अनुराधा कल्याणकर, गजानन माळी व सुधाकर माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा