महाराष्ट्र
सोलापूर प्रतिनिधी
ॲड. विक्रम वाघमारे यांच्यामार्फत 'या' व्यक्तीची दुचाकी वाहन चोरीच्या आरोपातून केली निर्दोष...
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर : रूपा भवानी मंदिरापासून दुचाकी गाडी चोरल्याच्या आरोपामध्ये जोडभावी पेठ पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी मनोज राठोड याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर आल्यानंतर यातील आरोपी मनोज राठोड यांनी ॲड. विक्रम वाघमारे यांच्यामार्फत गुन्ह्यामधून दोषमुक्त करण्याकरिता अर्ज केला.
सदरच्या अर्जामध्ये आरोपीतर्फे युक्तिवाद करताना आरोपी हा सदरच्या गुन्ह्यामध्ये सहभागी नव्हता तसेच त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्यातून दोष मुक्त करण्यासाठी केलेला अर्ज मंजूर केला. सदर व्यक्तीस दोषमुक्त केले. आरोपीच्यावतीने ॲड. विक्रम वाघमारे, ॲड. स्नेहल शिवपूजे व ॲड. आकाश बंगाळे यांनी काम पाहिले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा