आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव ओशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा
दिनांक ५ जुलै २०२५ रोजी दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (ICSE Pattern), जामनेर येथे आषाढी एकादशीचा पवित्र व भक्तिभावाने परिपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या चेअरमन सौ. लक्ष्मी वायकर मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ. सीमा श्रोत्रिया मॅडम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपान व संत मुक्ताई यांची सुंदर भूमिकांची सादरीकरणे साकारून उपस्थितांचे मन जिंकले. वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत विद्यार्थी टाळ-मृदुंगाच्या गजरात पावल्या खेळत हरिनामाचा जयघोष करीत माऊलीची दिंडी थाटात काढली.
शाळेच्या शिक्षिकांनीही मराठमोळा वेश परिधान करून भक्तिरसात रंगत माऊलीच्या दिंडीत सहभागी होत आनंद व्यक्त केला. या प्रसंगी सौ. सुचिता सोनवणे, सौ. कोमल शिंदे, सौ. नितु शर्मा, कु. संजना सोनी, सौ. वैशाली वले, कु. श्रुती जोशी तसेच श्री. मुकेश नारखेडे व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना उपवासाचे पदार्थ – केळी व बटाट्याची भाजी फराळ स्वरूपात देण्यात आले.
वारकरी भावनेचा जागर घडवणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मनात संस्मरणीय ठरला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा