नाचनखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. ज्योती कैलास पाटील यांची बिनविरोध निवड – गावाच्या सर्वांगीण विकासाचे दिले आश्वासन - दैनिक शिवस्वराज्य

नाचनखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. ज्योती कैलास पाटील यांची बिनविरोध निवड – गावाच्या सर्वांगीण विकासाचे दिले आश्वासन

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत सौ. ज्योती कैलास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या निवडणुकीत व्ही.डी. बागडे साहेब, अश्विनी बेंद्रे व ग्रामविकास अधिकारी अजय बी. वंजारी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. सरपंचपदासाठी सौ. ज्योती पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड सर्वानुमते व बिनविरोध जाहीर झाली.
या वेळी माजी सरपंचांनी सांगितले की, खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून मी सरपंचपदाचा राजीनामा दिला, असे त्यांनी नमूद केले.
निवड झाल्यानंतर नवीन सरपंच सौ. ज्योती कैलास पाटील यांनी पदभार स्वीकारताना गावाच्या विकासाचा संकल्प व्यक्त केला. त्या म्हणाल्या,
“गावातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत विकासकामांना गती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय असेल. सर्वांनी मला सहकार्य करावे ही विनंती.

या वेळी प्यानल प्रमुख हर्षल भाऊ चौधरी, माजी उपसरपंच आबेद पटेल, उपसरपंच श्रीकांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनंदा महेंद्र पाटील, सुरेखा मोरे, अरुण पाटील सर, इकबाल देशमुख, नितीन बाविस्कर, मच्छिंद्र पवार, विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष शाम पाटील, माजी चेअरमन सुभाष चौधरी, रतन भोई, धनंजय पाटील, केशव इंगळे, रामदास बाविस्कर, जिजाबाई चौधरी यांच्यासह गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांनी तसेच गावकरी मंडळींनी “आपल्या अभ्यासू व कार्यतत्पर नेतृत्वाखाली नाचणखेडा गावाला विकासाची नवी दिशा मिळेल,असा विश्वास व्यक्त केला व नवीन सरपंचांचे हार्दिक अभिनंदन केले.

सरपंच सौ. ज्योती कैलास पाटील यांना भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads