जामनेर गिरीजा कॉलनीत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न...
शुद्ध हवा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत गिरीजा कॉलनीतील नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर सोना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, भाजपा नेते जितुभाऊ पाटील, ज्येष्ठ नेते ऍड. शिवाजी नाना सोनार, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर शहर मंडळ अध्यक्ष रवींद्र झाल्टे, मंत्री ना. गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, "आपल्याला शुद्ध हवा आणि प्राणवायू मिळवायचा असेल, तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला केवळ पाने-फुले देत नाहीत, तर जगण्याची ऊर्जा, नवी आशा आणि उमेदही देतात. म्हणूनच वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे."
या कार्यक्रमाला श्रीलीला हॉस्पिटलचे संचालक डॉ. उमाकांत पाटील, डॉ. प्रशांत पाटील, प्रभू चौधरी, प्रल्हाद सोनवणे, सुधाकर पाटील, आर.डी. येवले सर, चौधरी सर, सुदाम चौधरी, दीपक पाटील, भास्कर महाजन, प्रकाश सैतवाल, संजय मोरे, मंगेश पाटील, विनोद बावस्कर, मनोज दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सोना बहुउद्देशीय संस्था व जे.एस.एम. ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाचे आयोजन करताना पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला.
वृक्षारोपण करताना मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, भाजपा नेते जितुभाऊ पाटील, ज्येष्ठ नेते ऍड. शिवाजी नाना सोनार, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर शहर मंडळ अध्यक्ष रवींद्र झाल्टे, मंत्री ना. गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे, डॉ. उमाकांत पाटील, डॉ. प्रशांत पाटील, प्रल्हाद सोनवणे, दीपक पाटील, भास्कर महाजन, मंगेश पाटील व इतर मान्यवर.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा