न्यू इंग्लिश स्कूल जामनेर चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश जिल्ह्यातील एकमेव शाळा
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून न्यू इंग्लिश स्कूल, जामनेरने इतिहास घडवत जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 15 विद्यार्थी आणि इयत्ता पाचवीच्या पूर्व प्राथमिक परीक्षेत 2 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश संपादन करणारी न्यू इंग्लिश स्कूल ही जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा – इयत्ता आठवीचे निकाल:
🏅 चि. ऋग्वेद श्रीपाद पेडगावकर – तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात तिसरे स्थान
🥈 चि. यश अनिल डोंगरे – जिल्ह्यात चौथे स्थान
🥉 चि. पाटील जयराज ईश्वर – जिल्ह्यात 29 वे
कु. पाटील निशा गजानन – 36 वी
चि. कोळी ओम राजेंद्र – 55 वा
कु. साळवे मीनल राजेंद्र – 85 वी
कु. भामरे सोनल मनोज – 108 वी
कु. पाटील प्राची प्रवीण – 115 वी
कु. तांडे अनघा उमाकांत – 126 वी
कु. पाटील सोनाक्षी उमेश – 127 वी
कु. शेळके सृष्टी नंदू – 138 वी
कु. जोशी रेणुका नरेंद्र – 150 वी
कु. शिसोदे नीलिमा रामेश्वर – 191 वी
कु. पाटील निकिता प्रवीण – 195 वी
कु. जाधव यशश्री हितेंद्र – 197 वी
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा – इयत्ता पाचवीचे निकाल:
चि. महाजन दक्ष महेश – 243 वा
चि. काकर दर्शन किरण – 254 वा
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे चि. ऋग्वेद श्रीपाद पेडगावकर याने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर व राज्यात नवव्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला होता.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन समिती प्रमुख श्री. ललित लामखडे सर यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले.
या उत्तुंग यशाबद्दल जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. जितेंद्र बाबुराव पाटील, सचिव मा. जितेंद्र रमेश पाटील, सर्व संचालक मंडळ, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे प्रतिक असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा अधोरेखित करणारे आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा