निबंध स्पर्धेत मालदाभाडी हायस्कूलची मोहिनी पाटील प्रथम..
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य शाखा जामनेर च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पहिल्या गटात मालदाभाडी हायस्कूल ची मोहिनी जितेंद्र पाटील इयत्ता सहावी हीचा प्रथम क्रमांक आला तीला एक हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, सन्मान पत्र मिळणार आहे. तसेच दुसऱ्या गटात जागृती सुधीर बोरसे इयत्ता नववी या विद्यार्थीनीला उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. मोहिनी च्या रुपाने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मालदाभाडी हायस्कूलला मिळालेला आहे. याचा आनंद पंचक्रोशीतील लोकांना झाला आहे.
या विद्यार्थ्यांनीना शाळेचे मराठी शिक्षक, ग्रीन आर्मी प्रमुख विजय सैतवाल यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या बद्ल शाळेचे प्र. मुख्याध्यापक एस.आर.शिकोकारे, सौ. करुणा महाजन, अरूण पाटील, गणेश पाटील, राजेंद्र कोळी, व्ही.आर.सैतवाल, एन जी पाटील,  नितीन पाटील, राजेश मोरे, मनोज जैन यांनी अभिनंदन केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा