महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडीची कु. मानसी यलगोंडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी ज.रा.चंडक प्रशाला बाळे ता. उत्तर सोलापूर येथे करण्यात आले होते.
या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी शाळेची विद्यार्थीनी कुमारी मानसी आण्णाराव यलगोंडे (इयत्ता ७ वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल कु. मानसीला रुपये दहा हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, अहिल्यादेवींची प्रतिकृती व पुस्तके असे बक्षिस मिळणार आहे. तसेच रोख पाच हजार रुपये बक्षीस गावडेवाडीचे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष तथा उद्योजक कैलास पांढरे व गावडेवाडी सरपंच संगीताताई पांढरे यांनी जाहीर केले. कु. मानसीने 'न्यायप्रिय व लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' या विषयावर आपले चिंतन मांडले. कु.मानसीला वर्ग शिक्षक डॉ. नागनाथ येवले यांचे मार्गदर्शन लाभले होते.
या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत, गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, सुदर्शन राठोड, गुरुबाळा सनके, आयुब कलबुर्गी, सैपन आळगी, केंद्रप्रमुख आमसिध्द म्हेत्रे, विजय गेंगाणे व श्री. जीवराज खोबरे व मुख्याध्यापक रेवणसिद्ध बिराजदार व सर्व शिक्षक स्टाफ राहुल भडकुंबे, परमेश्वर हराळे, दीपक मार्तंडे, ज्योती वाघमारे, माधुरी साबळे, तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष तथा उद्योजक कैलास पांढरे, सरपंच संगीता कैलास पांढरे, उपसरपंच बिराप्पा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुलाल मनियार, उपाध्यक्ष उज्ज्वला पंडीत गावडे, माजी सरपंच तानाजी यलगोंडे, बापू गावडे, गोविंद हाक्के, संतोष गावडे, संजय डोल्ले, रेवणसिद्ध गावडे, पंडीत गावडे व पोलीस पाटील विजय गावडे, सुखदेव गावडे व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा