जामनेर तालुक्यातील खादगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ...
जामनेर तालुका | जामनेर तालुक्यातील खादगाव गावात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील गौरव अरुण भोई (वय अंदाजे 18) या तरुणाने शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिकांना शेतामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. तात्काळ त्यांनी जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर कासार यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा करून तो जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या घटनेने संपूर्ण खादगाव परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पुढील तपास जामनेर पोलिसांकडून सुरू आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा