गोंदखेल हादरलं : घरकाम करताना नागाच्या दंशाने महिलेचा मृत्यू
जामनेर, ता. २३ :गोंदखेल गावात आज शोककळा पसरली आहे. घरकाम करणाऱ्या एका निरागस महिलेचा नाग चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव जयश्री शरद मगर असून १९ ऑगस्टच्या सकाळी ही घटना घडली. जयश्रीबाई झाडू मारत असताना अचानक हाताजवळील वस्तू उचलण्यासाठी गेल्या. त्याचवेळी त्यांच्या बोटाला काहीतरी चावले. सुरुवातीला काय चावले ते त्यांना कळलेच नाही. पण काही वेळातच बोट सुजून वेदना वाढू लागल्या.कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान “हे साधा उंदीराचा दंश नसून विषारी प्राण्याचा आहे” असे सांगितले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तब्बल दोन-तीन दिवस चाललेल्या उपचारांनंतरही आज अखेर जयश्रीबाईंचे निधन झाले.
दरम्यान, कुटुंबीयांनी घराजवळ शोध घेतल्यावर खरोखरच नाग आढळून आला. गावातील तरुणांनी मित्रांच्या मदतीने त्याला पकडले.या हृदयद्रावक घटनेमुळे गोंदखेड गावात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात निरागस जीव हिरावून नेणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा